माऊंट एव्हरेस्ट : बस नामही काफी है!(?)
एकेक राज्य जिंकून घेत आठराव्या शतकाच्या शेवटी इंग्रजांनी आपले पाय हिंदुस्थानात घट्ट रोवले होते. सैन्य, लढाया,नकाशे, पुढच्यायुद्धयोजना सतत सुरूच होत्या. मात्र एक अडचण होती. लढाईसाठी आवश्यक असणार् या tactical नकाशांमध्ये भारतातल्या प्रांतांची नेमकी भौगोलिक माहिती देणं खूप कठीण होतं. कारण जागांची अंतरं, पर्वतांची ऊंची, त्यांचे अक्षांश, रेखांश...अशा प्रकारची अचूक माहिती उपलब्ध नव्हती. त्यामुळे नकाशे आणि वस्तुस्थितीत तफावत येत असे. म्हणून यावर काम करण्याचं ब्रिटिश अधिकार् यांनी ठरवलं, विशेषतः टिपू सुलतानाशी झालेल्या लढाईनंतर. त्रिकोणमितीय किंवा शास्त्रीय दृष्टिकोनातून भारताचं सर्वेक्षण करण्यासाठी लेफ्टनंट कर्नल विल्यम लॅम्टन(William Lambton) याच्या नेतृत्वाखाली ईस्ट इंडिया कंपनीनं १० एप्रिल १८०२ रोजी एक प्रकल्प सुरू केला. जो नंतर Great Trigonometry Survey of India या नावानं प्रसिद्ध झाला. मद्रासपासून सुरू झालेलं हे काम वाढत हळूहळू उत्तर भारतातही सुरू झालं. पुढे १८३० साली सर जॉर्ज एव्हरेस्ट (Sir George Everest) हा भारताचा Surveyor General अर्थात मुख्य सर्वेक्षक अधिकारी म्हणून नियुक्त...