मातृतत्त्व - नर्मदा...! पुस्तक परिचय!
यह जीवन है क्या ? बतलाऊँ , काँटों का हैं ताजमहल । यह तन तो मिट्टी हैं जिसमें , कुछ साँसो का कोलाहल ।। हम कैसे अपने प्राणो की , हवा नहीं स्वीकार करें । हम कैसे अपने जीवन की , कथा नहीं स्वीकार करें ।। सध्याच्या या परिस्थितीमध्ये आपल्याला कुठे जायचं नाही , कोणाशी लढायचं नाही ... आपला संघर्ष सुरु आहे सभोतालची परिस्थिती स्वीकारण्यासाठी ... चिंता आहे तिच्यातल्या अनिश्चिततेची ..! म्हणूनच आपल्याला प्रेरणा हवी आहे इथून पुढे सकारात्मकतेने पुढे चालत राहण्याची ...! आज घरच्या लायब्ररी मधेच ' मातृतत्त्व - नर्मदा ' हे श्री नंदकिशोर गर्गे यांनी लिहिलेलं पुस्तक हाती लागलं आणि त्यावर लिहिण्याची इच्छा झाली ! चरैवेति ... म्हणजे चालत रहा ... चालत रहा या प्रेरणेशी मी तत्काळ जोडल्या गेले आणि तुम्हा सगळ्यांपर्यंत हे पोचवावंसं वाटलं ! चरैवेति .. मधे चालण्याची दृढ संकल्प शक्ती , ओढ अध्यारुत आहे ! फारशी अध्यात्मिक पार्श्वभूम...