Posts

वयम मासिक - राणी अबाक्का महादेवी - शौर्यकथा

    बालमित्रांनो, भारताच्या इतिहासातली ही गोष्ट आहे सोळाव्या शतकातली! त्यावेळी आजच्या कर्नाटकातला अखंड दक्षिण कन्नड जिल्ह्याला व्यापणारा आणि त्याच्या सभोवतीचा प्रदेश ‘तुलूनाडू’ या नावानं प्रसिद्ध होता. तुलू भाषा बोलणार्‍या शूर आणि साहसी लोकांचा हा समृद्ध प्रदेश विजयनगर साम्राज्यात अंतर्भूत होता. इथे मुबलक प्रमाणात होणारे  मसाले , कपडा , तांदूळ , औषधी अशा विविध गोष्टींना युरोप आणि इतर अनेक देशांमधे प्रचंड मागणी होती. भारताच्या समुद्र किनारपट्टीवर आंतरराष्ट्रीय व्यापाराची अनेक केंद्रं होती. यापैकीच एक म्हणजे मंगळुरूजवळ असलेलं उल्लाल हे छोटं बंदर! नेत्रावती आणि गुरुपूरा नद्यांच्या संगमावर वसलेलं हे बंदर लढाईच्या दृष्टीनं सुद्धा महत्त्वपूर्ण होतं! अशा या उल्लालमधली राणी अबाक्का महादेवी म्हणजे चौटा राजवंशातली शूर वीरांगना! या राणीने  व्यापाराच्या आडून सत्ता काबिज करणार्‍या पोर्तुगिजांना ओळखलं आणि त्यांच्याबरोबर चिवटपणे लढा दिला.     पोर्तुगिजांचा भारतात प्रवेश   १४९८ साली पोर्तुगालचा वास्को-द-गामा समुद्री मार्गाने भारतात शिरला आणि भारतीय इतिहासा...

वयम मासिक - राणी रासमणी (रशमोनी)- शौर्यकथा

  १८४० साली इंग्रजांच्या अधिपत्त्याखाली असलेल्या बंगालमध्ये घडलेला एक ऐतिहासिक प्रसंग! वर्षानुवर्षांपासून गंगेच्या पाण्यावर मासेमारीचा व्यवसाय चालत आलेला होता. शेकडो कोळी कुटुंबांची उपजीविका त्यावर चालत असे.   तरीही या मासेमाऱ्यांमुळे मालाची ने-आण करणाऱ्या   जहाजांना मोठा अडथळा निर्माण होतो हे कारण पुढे करून इंग्रज अधिकाऱ्यांनी हुगळी नदीमध्ये मासेमारी करण्यावर मोठा कर लावला. हुगळी म्हणजे गंगेची उपनदी!   इंग्रजांच्या या धोरणाविरुद्ध दाद मागत कोळी बांधव   जमीनदार असलेल्या राणी रशमोनीकडे गेले. इंग्रजांची धूर्त चाल राणीने चांगलीच ओळखली.पुढे ज्या चातुर्याने तिने त्यांना काटशह दिला, ते अवाक् करणारं होतं!तिच्या चातुर्यात तिचं शौर्य प्रकटलेलं होतं!   राणीने हुगळी नदीतला १० किलोमीटर्स लांब प्रवाहाचा पट्टा ईस्ट इंडिया कंपनीकडून भाड्याने घेतला. तसा करार करून झाल्यावर तिने प्रचंड मोठ्या साखळ्या दोन्ही   बाजूंनी लावल्या. इथे नदीचा प्रवाह धनुष्याकार झालेला होता. याठिकाणी तिने तिची खाजगी मालमत्ता जाहीर करत मासेमाऱ्यांना काम सुरू करण्यासाठी सांगितलं. तिथे हळुहळू त्य...

जय हिंद सर - श्रद्धांजली...!

Image
अकॅडेमीमधलं ट्रेनिंग संपवून आम्ही पुढच्या तयारीत गुंतलो होतो. दीक्षांत समारोह अर्थात्  पासिंग आऊट  परेड दोन दिवसांवर येऊन ठेपली होती. त्यासाठी विशेष निमंत्रित असणारे आम्हा सर्वांचे पालक अकॅडेमीमध्ये दाखल होत होते. एकीकडे सांस्कृतिक कार्यक्रमांचा सराव, दुसरीकडे विविध गणवेश आणि बुटांची तयारी, त्यात आईबाबा आल्यावर त्यांना हे दाखवू की ते दाखवू याकडे ओढ घेणारं मन...अशी प्रचंड गडबड सुरू होती. तेवढ्यात घामाघुम होऊन एक कोर्समेट पळत आली आणि मला म्हणाली, “कुछ कांड किया क्या गार्गी तूने?  सिद्धा अॅडजुटंटसे बुलावा आया है!जा भाग जल्दी|”   अॅडजुटंट म्हणजे ‘दंडपाल’, जो संपूर्ण अकॅडेमीचं प्रशासन बघतो! आजवर एकाच कारणासाठी तिथून बोलावणं येत असे, ते म्हणजे ‘पनिश्मेन्ट’! आधी अनेकदा माझी वर्णी लागली होती तिथे पण आता अगदी दोनच दिवस राहिले असताना सुद्धा शिक्षा.. म्हणजे अतीच झालं असा विचार करत मी तडक त्यांचं ऑफिस गाठलं. सल्युट करून उभी राहिले.  त्यांनी ‘विश्राम’ आज्ञा देत बोलायला सुरुवात केली. “परवाच्या पासिंग आऊट परेडसाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभले आहेत लेफ्टनंट जनरल श्र...

निरामयआरोग्यवर्धिनी जीवनशैली आणि बरंच काही

Every next level of life will demand a different version you ....याचा अनेकदा प्रत्यय येतो. जीवन म्हणजे एकाच मार्गाने पुढे जाणारं चाकोरीबद्ध यंत्र नसून, अनेक गोष्टींना कवेत घेत, सहस्त्रधारांनी पुढे जाणारा तो चैतन्यदायी, खळाळता   प्रवाह आहे! हे अनुभवण्यासाठी आपण निराशेची कात टाकत, प्रत्येक टप्प्यावर   नित्यनूतन होऊन त्याला सामोरं गेलं तर जगण्यातली   मजा वाढते! आपल्या आयुष्याचा आलेख समजून घेत,त्यात नव्याने झालेल्या बदलांची नोंद घेत, त्या त्या आव्हानांसाठी मोकळेपणाने स्वतःची तयारी करत पुढे गेलो तर आयुष्य बरंच सोपं,सहज आणि सुंदर होत जातं असा माझा अनुभव आहे. मग तो मातृत्त्वाचा टप्पा असो वा शरीराच्या दुखापती जिद्दीने भरून काढण्याचा, डोळसपणे त्यांच्याकडे बघण्याचा प्रयत्न खूपकाही देऊन गेला, मुख्य म्हणजे आत्मविश्वास! आज इतर विषय सोडून अचानक हे तत्त्वज्ञान आठवण्याचं किंवा स्वतःविषयी काही सांगण्याचं कारण म्हणजे ‘निरामय आरोग्यवर्धिनी’ जीवनशैलीचा नुकताच झालेला परीसस्पर्श! ‘ Age is just a number ’ असं कितीही म्हंटलं, तरी त्या त्या वयाच्या टप्प्यावर शरीर त्याच्याकडे लक्षं द्यायला आपल...
  जेव्हा समर्थ रामदास गुरु हरगोविंद सिंहाना भेटतात...! गढवाल टेकड्यांमधे अलकनंदा नदीच्या काठावर वसलेलं अत्यंत निसर्ग रम्य ठिकाण – श्रीनगर! (आताच्या उत्तराखंडातल्या पौडी गढवाल जिल्ह्यात). सोळाव्या शतकाच्या सुरूवातीला राजा अजय पाल यानं अनेक गढ्यांना एकत्र करून एकसंध अशा गढवाल राज्याचा पाया रचला. या राज्याची राजधानी म्हणजे हे श्रीनगर! इथेच इ.स. १६३४ च्या आसपास संतशक्तीच्या भेटीचा एक विलक्षण योग भारतीय इतिहासानं अनुभवला! एकिकडे होता वैराग्य आणि शौर्य यांचा अद्भुत संगम अर्थात् अनेक युद्धांत प्रत्यक्ष नेतृत्त्व करणारे शिखांचे गुरु...तर समोर होते १२ वर्षं कठोर तपश्चर्या करून उत्तर भारतात भ्रमंतीसाठी आलेले दक्खनच्या भूमितले सामर्थ्यशाली संतचैतन्य! ही वरवर दोन व्यक्तींची वा सन्याशांची साधी भेट वाटून घेण्याचं कारण नाही. शमप्रधानेषु तपोधनेषु गूढं हि दाहात्मकमस्ति तेज..!(क्षमाशील अशा तपोनिधीच्या अंतरात गूढ असं दाहात्मक तेजही असतं) या कालिदासाच्या उक्तीनुसार...अंगावर भगवी वस्त्रं आणि वृत्तीमध्ये वैराग्य असूनही अंतरात स्वधर्मनिष्ठेचं प्रखर तेज बाळगणार् ‍ या दोन राष्ट्रद्रष्टयांची ती भेट होती!...
आठवणीतल्या वीणाताई.... आदरणीय वीणाताई देव यांचं जाणं मनाला चटका लावणारं आहे. त्यांच्या काही सुखद आणि दुर्मिळ आठवणी मनाच्या कुपीत मी कायमच्या जपून ठेवल्या आहेत. काही काळासाठी दक्षिण कमान मुख्यालय (Southern Command) पुणे इथे माझी पोस्टिंग होती. त्यावेळी आमचा अतिशय जवळचा आणि धाडसी मित्र समीर धामणगावकर, Snovel India संस्थेचा संस्थापक, मराठी साहित्य ऑडिओमध्ये रूपांतरित करण्याच्या ध्यासाने झपाटलेला होता. तेव्हा वैभवही त्यात बराच सक्रिय होता आणि या दोघांमुळे मी सुद्धा snovel शी जोडले गेले. हे क्षण फार सुरेख होते! त्यावेळी गो. नी. दांडेकरांच्या पडघवली,शितू अशा काही अजरामर पुस्तकांच्या अभिवाचनाचे कार्यक्रम वीणाताई करत असत. त्यापैकी 'शितू ' ही सीडी Snovel तर्फे काढण्याचं निश्चित झालं. ती आणि बरोबर इतर काही सीडीज् यांच्या अनावरणासाठी पुण्यात कार्यक्रम ठरला. अच्युत गोडबोले सर आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले तर आमच्या सुदैवाने वीणाताईंच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात सूत्रसंचालन करण्याची संधी मला मिळाली! त्यादरम्यान वीणाताईंशी फोनवर होत असलेला संवाद, त्यांच...