जेव्हा समर्थ रामदास गुरु हरगोविंद सिंहाना भेटतात...! गढवाल टेकड्यांमधे अलकनंदा नदीच्या काठावर वसलेलं अत्यंत निसर्ग रम्य ठिकाण – श्रीनगर! (आताच्या उत्तराखंडातल्या पौडी गढवाल जिल्ह्यात). सोळाव्या शतकाच्या सुरूवातीला राजा अजय पाल यानं अनेक गढ्यांना एकत्र करून एकसंध अशा गढवाल राज्याचा पाया रचला. या राज्याची राजधानी म्हणजे हे श्रीनगर! इथेच इ.स. १६३४ च्या आसपास संतशक्तीच्या भेटीचा एक विलक्षण योग भारतीय इतिहासानं अनुभवला! एकिकडे होता वैराग्य आणि शौर्य यांचा अद्भुत संगम अर्थात् अनेक युद्धांत प्रत्यक्ष नेतृत्त्व करणारे शिखांचे गुरु...तर समोर होते १२ वर्षं कठोर तपश्चर्या करून उत्तर भारतात भ्रमंतीसाठी आलेले दक्खनच्या भूमितले सामर्थ्यशाली संतचैतन्य! ही वरवर दोन व्यक्तींची वा सन्याशांची साधी भेट वाटून घेण्याचं कारण नाही. शमप्रधानेषु तपोधनेषु गूढं हि दाहात्मकमस्ति तेज..!(क्षमाशील अशा तपोनिधीच्या अंतरात गूढ असं दाहात्मक तेजही असतं) या कालिदासाच्या उक्तीनुसार...अंगावर भगवी वस्त्रं आणि वृत्तीमध्ये वैराग्य असूनही अंतरात स्वधर्मनिष्ठेचं प्रखर तेज बाळगणार् या दोन राष्ट्रद्रष्टयांची ती भेट होती!...
Posts
Showing posts from November, 2024
- Get link
- X
- Other Apps
आठवणीतल्या वीणाताई.... आदरणीय वीणाताई देव यांचं जाणं मनाला चटका लावणारं आहे. त्यांच्या काही सुखद आणि दुर्मिळ आठवणी मनाच्या कुपीत मी कायमच्या जपून ठेवल्या आहेत. काही काळासाठी दक्षिण कमान मुख्यालय (Southern Command) पुणे इथे माझी पोस्टिंग होती. त्यावेळी आमचा अतिशय जवळचा आणि धाडसी मित्र समीर धामणगावकर, Snovel India संस्थेचा संस्थापक, मराठी साहित्य ऑडिओमध्ये रूपांतरित करण्याच्या ध्यासाने झपाटलेला होता. तेव्हा वैभवही त्यात बराच सक्रिय होता आणि या दोघांमुळे मी सुद्धा snovel शी जोडले गेले. हे क्षण फार सुरेख होते! त्यावेळी गो. नी. दांडेकरांच्या पडघवली,शितू अशा काही अजरामर पुस्तकांच्या अभिवाचनाचे कार्यक्रम वीणाताई करत असत. त्यापैकी 'शितू ' ही सीडी Snovel तर्फे काढण्याचं निश्चित झालं. ती आणि बरोबर इतर काही सीडीज् यांच्या अनावरणासाठी पुण्यात कार्यक्रम ठरला. अच्युत गोडबोले सर आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले तर आमच्या सुदैवाने वीणाताईंच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात सूत्रसंचालन करण्याची संधी मला मिळाली! त्यादरम्यान वीणाताईंशी फोनवर होत असलेला संवाद, त्यांच...