Posts

Showing posts from June, 2025

वयम मासिक - राणी अबाक्का महादेवी - शौर्यकथा

    बालमित्रांनो, भारताच्या इतिहासातली ही गोष्ट आहे सोळाव्या शतकातली! त्यावेळी आजच्या कर्नाटकातला अखंड दक्षिण कन्नड जिल्ह्याला व्यापणारा आणि त्याच्या सभोवतीचा प्रदेश ‘तुलूनाडू’ या नावानं प्रसिद्ध होता. तुलू भाषा बोलणार्‍या शूर आणि साहसी लोकांचा हा समृद्ध प्रदेश विजयनगर साम्राज्यात अंतर्भूत होता. इथे मुबलक प्रमाणात होणारे  मसाले , कपडा , तांदूळ , औषधी अशा विविध गोष्टींना युरोप आणि इतर अनेक देशांमधे प्रचंड मागणी होती. भारताच्या समुद्र किनारपट्टीवर आंतरराष्ट्रीय व्यापाराची अनेक केंद्रं होती. यापैकीच एक म्हणजे मंगळुरूजवळ असलेलं उल्लाल हे छोटं बंदर! नेत्रावती आणि गुरुपूरा नद्यांच्या संगमावर वसलेलं हे बंदर लढाईच्या दृष्टीनं सुद्धा महत्त्वपूर्ण होतं! अशा या उल्लालमधली राणी अबाक्का महादेवी म्हणजे चौटा राजवंशातली शूर वीरांगना! या राणीने  व्यापाराच्या आडून सत्ता काबिज करणार्‍या पोर्तुगिजांना ओळखलं आणि त्यांच्याबरोबर चिवटपणे लढा दिला.     पोर्तुगिजांचा भारतात प्रवेश   १४९८ साली पोर्तुगालचा वास्को-द-गामा समुद्री मार्गाने भारतात शिरला आणि भारतीय इतिहासा...

वयम मासिक - राणी रासमणी (रशमोनी)- शौर्यकथा

  १८४० साली इंग्रजांच्या अधिपत्त्याखाली असलेल्या बंगालमध्ये घडलेला एक ऐतिहासिक प्रसंग! वर्षानुवर्षांपासून गंगेच्या पाण्यावर मासेमारीचा व्यवसाय चालत आलेला होता. शेकडो कोळी कुटुंबांची उपजीविका त्यावर चालत असे.   तरीही या मासेमाऱ्यांमुळे मालाची ने-आण करणाऱ्या   जहाजांना मोठा अडथळा निर्माण होतो हे कारण पुढे करून इंग्रज अधिकाऱ्यांनी हुगळी नदीमध्ये मासेमारी करण्यावर मोठा कर लावला. हुगळी म्हणजे गंगेची उपनदी!   इंग्रजांच्या या धोरणाविरुद्ध दाद मागत कोळी बांधव   जमीनदार असलेल्या राणी रशमोनीकडे गेले. इंग्रजांची धूर्त चाल राणीने चांगलीच ओळखली.पुढे ज्या चातुर्याने तिने त्यांना काटशह दिला, ते अवाक् करणारं होतं!तिच्या चातुर्यात तिचं शौर्य प्रकटलेलं होतं!   राणीने हुगळी नदीतला १० किलोमीटर्स लांब प्रवाहाचा पट्टा ईस्ट इंडिया कंपनीकडून भाड्याने घेतला. तसा करार करून झाल्यावर तिने प्रचंड मोठ्या साखळ्या दोन्ही   बाजूंनी लावल्या. इथे नदीचा प्रवाह धनुष्याकार झालेला होता. याठिकाणी तिने तिची खाजगी मालमत्ता जाहीर करत मासेमाऱ्यांना काम सुरू करण्यासाठी सांगितलं. तिथे हळुहळू त्य...