Posts

Showing posts from August, 2020

कारगिल गर्ल सारखे चित्रपट : फलित काय?

  “ तुमच्या आर्मी किंवा एअर फोर्स मध्ये असंच वातावरण असतं का ? तुझा काय अनुभव ? ” “काय काय दाखवलं आहे या चित्रपटात...बापरे! मी तर असं ऐकलं होतं की   संरक्षण दलांमध्ये स्त्रियांना   फार सन्मानाने वागवलं जातं...खोटं आहे का ते... ?” “मुलींसाठी हा चित्रपट प्रेरणादायी आहे   पण मुलांमधली   एअर फोर्स मध्ये जाण्याची प्रेरणा मात्र कमी झाली ...कारण आज मुलांनाही अशाच ठिकाणी काम करायला आवडेल जिथे स्त्रियांना अपमानास्पद वागणूक   मिळत नाही उलट बरोबरीने , सन्मानाने वागवलं जातं...!” हे आणि असे अनेक प्रश्न एका चित्रपटामुळे सध्या विचारण्यात येत आहेत...आणि मला सहज आठवतात अनेक क्षण...माझ्या क्षमतेवर   विश्वास ठेऊन जेव्हा अतिशय जोखमीच्या जबाबदर्‍या माझ्यावर सोपवल्या गेल्या...!   आर्मी मध्ये सुरुवातीलाच पाहिलेला तो   कठीण काळ...कठीण जागा   जिथून दूरवरसुद्धा   महिनोंमहिने एकही स्त्री दिसायची नाही! वादळात   किंवा बर्फ पडत असताना अंधार्‍या रात्री तासा तासाला जाऊन चेक केलेले पोस्ट्स...जवानांवर विश्वास ठेऊन त्यांच्याबरोबर केलेला दीर्घ   प्र...