भारताच्या दुर्गा : ९. राणी अवंतीबाई: १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामातली तळपती तलवार!
ब्रिटिशांविरुद्धचा उठाव स्वातंत्र्य संग्रामात रूपांतरित झाला आणि बघता बघता हा वणवा भारतभर पसरला! आजूबाजूची अनेक राज्यं खालसा केली जात असतांना ब्रिटिशांच्या मोठ्या सैन्याबळासमोर , आधुनिक शस्त्रांसमोर गुडघे न टेकवता आपल्या अफाट धैर्याने शेवटच्या श्वासापर्यंत झुंजणारे हे स्वातंत्र्यवीर कोणत्या मातीचे बनलेले होते ? अशीच वज्रनिश्चयी आणि धैर्याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे रामगढची राणी अवंतीबाई...जिने पहिल्या लढाईमधे ४००० सैन्यासह चढाई करून ब्रिटीशांना पराभव चाखवून परत पाठवलं. आणि दुसर्या युद्धांत ब्रिटीशांच्या हाती सापडण्यापेक्षा जिवाची बाजी लाऊन...अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी क्रांतीची ही ज्वाला अमर झाली! स्वातंत्र्याची ऊर्मी तिच्या रगांरगांत वहात होती! २६ एप्रिल १८३१ ला मध्यप्रदेशच्या मनकेहणीमधे राणी अवंतीबाईचा जन्म झाला. लोधी समाजाचे जमीनदार जुझार सिंह तिचे वडील होते. लहानपणापासून अतिशय धाडसी असलेली अवंती बाई निर्भीडपणे स...