शहामतपनाह बाजीराव - ग्रंथपरिचय
भारताच्या इतिहासाचं सामर्थ्य आणि अमरत्त्वं ठळकपणे मांडत स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्या रणशिंग या पुस्तकांत लिहितात,“कागदावर लिहिलेले इतिहास फाडले तरी ते दगडांवर कोरलेले आहेत. त्या दगडांचे चूर्ण केलेत तरी इतिहास मरतोच असे नाही. भाषेत,वाक्प्रचारांतून, चालीरीतीमध्ये,स्मृतींच्या रोमरोमांत तो भिनलेला असतो. मूर्तीभंजकांचे दुर्बल हात सहसा न पुरतील इतका वर आकाशात उंच उंच अशोकाच्या स्तूपावर तो विराजत असतो किंवा भूगर्भातील खोल खोल मोहोंजोंदडोसारख्या पातालमंदिरात त्याची ग्रंथालयं सहस्त्रावधि वर्षं अभंगची अभंग राहतात!” या ओळी कुठलंही स्पष्टीकरण न लागणार् या आहेत! भारत हा वीरांचा देश आहे...इथे कणांकणांतून शौर्य प्रकटतं! असं असतांनाही काही वीरांना मात्र उपेक्षेचं, गैरसमजांचं ग्रहण वर्षानुवर्षे झाकोळून टाकतं. याचं मोठंच उदाहरण म्हणजे म्हणजे थोरला बाजीराव पेशवा! आत्तापर्यंतच्या कलाकृतींमधे रंगवलेल्या त्याच्या विलासी प्रतिमेतून बाहेर काढून या वीराला अद्वितीय योद्धा म्हणून आपल्यासमोर आणणारा एक अभ्यासपूर्ण ग्रंथ नुकताच वाचनात आला- श्री कौस्तुभ कस्तुरे लिखित “शहामतपनाह बाजीराव!” राफ्टर पब्लिकेशनने प्...