"या सम हा" - अजिंक्य बाजीरावाच्या युद्धनेतृत्त्वाची लोकविलक्षण यशोगाथा - ग्रंथपरिचय
शौर्यं तेजो धृतिर्दाक्ष्यं युध्दे चाप्यपलायनम्। दानमीश्वरभावश्च क्षात्रं कर्म स्वभावजम् ॥ गीतेच्या या श्लोकात सांगितल्याप्रमाणे शौर्य , तेज , निर्धार , दक्षता , धैर्य , औदार्य , नेतृत्व इ . गुण ज्यांच्यामध्ये मूर्तिमंत झाले असे धुरंधर योद्धे भारतामध्ये होऊन गेले ! यापैकी एक नाव म्हणजे थोरला बाजीराव पेशवा ! बाजीरावच्या संपूर्ण कारकिर्दीला प्रभावीपणे आपल्यासमोर मांडणारा एक अभ्यासपूर्ण ग्रंथ नुकताच वाचनात आला - ' या सम हा '. स्वतः एक कुशल योद्धा आणि रणनीतीमध्ये निष्णात असलेल्या मेजर जनरल शशिकांत पित्रे ( निवृत्त ) यांनी हा ग्रंथ लिहिलेला असल्याने यात अतिशय अचूक आणि स्तिमित करणारं रणनीतीचं विश्लेषण वाचायला मिळतं ! बाजीरावसारख्या वीरश्रेष्ठाच्या शौर्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून शेकडो वर्षं केवळ त्याच्या प्रेमविलासाचं उदात्तीकरण करणाऱ्या सगळ्यांच्याच डोळ्यांत घातलेलं हे झणझणीत अंजन आहे ! हीच खंत लेखकाला जाणवली की बाजीराव कसा मालिका , चित्रपट यांतल्या प्रेमकथेपाशीच ...