कर्नल अनिल गोगटे (नि.)यांच्या Viva Life Skills – Trainers & Consultants या you tube channel साठी थेट युद्धाच्या कथा अर्थात् field वरचे अनुभव कथन करण्याचा योग आला. आर्मीमध्ये दीर्घकाळ सेवा दिल्यानंतर सरांनी आतापर्यंत अनेक युद्धकथा प्रत्यक्ष सेना अधिकार्यांकडून वदवून घेतल्या आहेत. त्या संपूर्ण भारतातल्या प्रेक्षकांसाठी प्रेरणादायी आहेत. मीही त्यातल्या काही ऐकल्या आणि आपण या परंपरेचा भाग आहोत याचा गर्व वाटला! खरंतर कधी गोपनीयता म्हणून तर कधी संकोच म्हणून माझ्याकडून फारसं “थेट” field वरचं सांगितलं गेलं नसावं. मात्र सरांच्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमामुळे हे कथन करण्याचा योग आला. आजच्या तुलनेनं तशा अगदी मोजक्याच महिला अधिकारी सीमालगतच्या भागात असण्याचा हा २००७ -२००८ चा काळ होता. माझ्यासारख्या कमी अनुभव असलेल्या junior officer लाही सरांनी मोकळेपणानं बोलतं केलं. you tube वर हा video पाहून अनेकांनी खूप सकारात्मक प्रतिक्रिया मला कळवल्या आणि इथे share करण्याविषयी आग्रह केला. म्हणून याची link इथे comments मध्ये देत आहे. या channel वरचे इतर videos ही आवर्जून बघावेत. सैन्याचा एक अधिकारी गणवेशात आणि त्या बाहेरही कायमच सजग असतो आणि समाजाला ऊर्जा देण्याचं काम निरंतर करत रहातो हे माझ्यासाठी अनुकरणीय आहे!
विविध कार्यक्रम आणि लेखन- प्रकल्पांच्या निमित्तानं महाराष्ट्र आणि इतर राज्यांमधल्याही चांगलं काम करणार्या लोकांशी परिचय वाढत आहे याचा मला नितांत आनंद आहे. परमेश्वरानं सत्संगतीच्या बाबतीत कायमच माझ्यावर वरद हस्त ठेवलेला आहे. त्यामुळे विना सायास मी आयुष्याच्या सगळ्याच टप्प्यांवर प्रचंड समृद्ध होत गेले. आताचाही टप्पा त्याला अपवाद नाही! फक्त वेळेअभावी सगळं इथे share केलं जात नाही एवढंच. कर्नल अनिल गोगटे या वयानं, अनुभवानं ज्येष्ठ आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्वाची ओळख तसंच off camera त्यांच्याशी झालेल्या मनमोकळ्या गप्पा खूपच समाधान देऊन गेल्या! मी नव्यानं officer होऊन तैनात झाल्यावरच्या गंमती जंमतींवरही आम्ही हसलो! Anil Laxman Gogate कर्नल गोगटे सरांना मन:पूर्वक शुभेच्छा! Thank you Col Anand Bapat Retd कर्नल बापट सर. तुम्ही मला Viva Life Skills शी जोडलंत. त्या निमित्तानं तुमचंही अत्यंत प्रभावी असं कथन मला ऐकायला मिळालं. प्रेरक अशी मोठीच अनुभवांची शिदोरी तरुण पिढीसाठी तुम्ही उघडत आहात ही अनुकरणीय गोष्ट आहे!तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
स्वत:वर विश्वास ठेऊन चालत रहा असं सांगणारा...गणवेशातल्या आठवणींनी भरलेला आणि भारलेला हा कप्पा आजही मला चांगलं काम करण्यासाठी तसंच भरभरून आयुष्य जगण्यासाठी सतत ऊर्जा देत राहो!

- मेजर मोहिनी गर्गे-कुलकर्णी (नि.) 

Comments

Popular posts from this blog

जय हिंद सर - श्रद्धांजली...!

निरामयआरोग्यवर्धिनी जीवनशैली आणि बरंच काही