गप्पांगण पॉडकास्ट – कारगिल युद्ध
१५ जानेवारी हा लष्कर दिन आणि कारगिल विजयाचं हे २५ वं स्मरणवर्षं. या दोन्हींचं औचित्य साधून Amol Kulkarniयाच्या गप्पांगण या पॉडकास्टमध्ये कारगिल युद्ध हा विषय सविस्तर मांडण्याची संधी मिळाली. उल्लेखनीय गोष्ट अशी की खूप जिज्ञासा दाखवत या विषयाला मुळातून समजून घेण्याचा प्रयत्न अमोलनं केला. आणि अगदी साध्या भाषेत, गोष्टी सोप्या करत हा विषय सगळ्यांपर्यंत कसा पोहोचेल यासाठी विशेष प्रयत्न केले. मुळात काश्मीरचा इतिहास, कारगिल युद्धाच्या आधीची दहशतवादानं उद्ध्वस्त केलेली दोन दशकं आणि यात दडलेली कारगिल युद्धाची बीजं, तेव्हाचं आंतरराष्ट्रीय राजकारण, प्रत्यक्ष युद्धतल्या मोहिमा आणि युद्धानंतर राज्यकर्ते तसंच भारतीय संरक्षणदलांना लागलेला शोध आणि मिळालेला बोध असा व्यापक आराखडा बांधून त्यावर सविस्तर गप्पा झाल्या.
त्याच्या या podcast वर अनेक तज्ञांशी विविध विषयांवर मारलेल्या गप्पा आहेत. वेळ काढून त्याही ऐका. तुझी ही जिज्ञासा अशीच ठेव अमोल भावा. स्तुत्य उपक्रम आहे.
कारगिल विषयावरचा हा पॉडकास्ट अवश्य ऐका आणि त्यावर प्रतिक्रिया द्या. गप्पांगणला खूप खूप शुभेच्छा! जय हिंद!
- मेजर मोहिनी गर्गे – कुलकर्णी (नि.
Comments
Post a Comment