बकुळ

माझ्या हातून लाविली
छोटी बकुळ अंगणी
आई बाबांनी वाढवली
आज साजरी देखणी!
आजवर किती झाले
ईथे मायेचे सोहळे
तिने पुरवले सुखे
माझे सुगंधी डोहाळे
आज तिच्या सावलीत
माझ्या लेकी बागडती
गूज गोष्टींना बहर
विसावती आजी - नाती!
पुन्हा नवीन रोपटी
पुन्हा नवी रुजवात
दोन कळ्या या लाघवी
आजी समाधानी तृप्त!
माझ्या माहेरी अंगणी
बहरो अशीच बकुळ
नित्य फुलांच्या या राशी
त्यात स्मृतींचा दरवळ!
- मोहिनी©

Comments

Popular posts from this blog

जय हिंद सर - श्रद्धांजली...!

निरामयआरोग्यवर्धिनी जीवनशैली आणि बरंच काही