आठवणींचे पिंपळपान...!
#पसायदान हे!
पिंपळाच्या पानांना जाळी पाडणं हा माझा आवडता छंद! शाळा-कॉलेजमधे असतांना कितीतरी वेळ यात रमत असे मी. बाथरूममध्ये जाळी पाडण्याची एक छोटी factory च set केली होती असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. यासाठी मुद्दाम पायी चालून पिंपळाची खाली पडलेली चांगली पानं निवडणं, ती टबमधे पाण्यात ठेवणं, देखरेख करत रहाणं...मनापासून छान वाटायचं! नंतर नाजूक हातानं ती साफ केल्यावर जेव्हा जाळी पडलेलं संपूर्ण पान हातात यायचं तेव्हा किती आनंद व्हायचा! मग या पानांवर कवितेच्या आवडत्या ओळी, श्लोक लिहून वा painting करून ती पानं मित्र मी मैत्रिणींना वाढदिवसाला gift म्हणून द्यायला लागले. पानांना हलकेच कट करून त्याची greetings सुद्धा बनवू लागले. असंच काही वर्षांपूर्वी बाबांच्या एका वाढदिवसाला त्यांना देण्यासाठी पिंपळपान हातात घेतलं. मनात विचार आला...काय लिहावं? ....आणि माऊलींनी थेट संपूर्ण पसायदानच लिहून घेतलं!
(बाबांना दाखवून नंतर ते पिंपळपान मी स्वतः कडेच ठेऊन घेतलं
!!!). पुस्तकात सापडलं अचानक म्हणून इथे सहज शेयर करतेय. आता जाळीदार पान तयार झाल्यावर आनंद होतोच, पण त्याहीपेक्षा मुलींचे आनंदानं विस्फारलेले डोळे बघायला जास्त मजा येते!
- मोहिनी.
Comments
Post a Comment